गंगापूर प्रतिनिधी
येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सोमाणी मैदान, बस स्टँडजवळ, होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे १३ वे वंशज भूषणसिंहराजे होळकर राहणार असून माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य आ. दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन राजे यशवंतराव होळकर प्रतिष्ठान, गंगापुर यांनी केले आहे.
0 टिप्पण्या