पैठण प्रतिनिधी
श्रीनाथ हायस्कूल पैठण येथे दि. ४ सप्टेंबर २०२४ महावाचन चळवळ निमित तालुकास्तरीय वाचनीय पुस्तकांचे ग्रंथालय व पुस्तक मेळावा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून शाळेतील ग्रंथालयामध्ये उपलब्ध असलेले अनेक पुस्तकांचा संच नेऊन प्रदर्शनामध्ये शाळेतील विद्यार्थी व सहशिक्षक गुडदे सर यांनी सहभाग नोंदवला.
पैठण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीराम केदार व विस्ताराधिकारी मुस्ताक शेख पाटेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीपजी थोटे, पैठण केंद्र क्रमांक दोनचे केंद्रप्रमुख वाडेकर सर सेवानिवृत्त विस्तार अधिकारी प्रकाश लोखंडे शाळेचे मुख्याध्यापक सचिन शेवणकर श्रीनाथ हायस्कूलचे प्राचार्य शिवाजी पठाडे संदिपान विद्यालय शेकटाचे मुख्याध्यापक आप्पासाहेब रणशूर व कौशल्या विद्यामंदिर पाटेगाव शाळेचे मुख्याध्यापक निलेश गायकवाड जिल्हा परिषद व खाजगी शाळेचे शिक्षक यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना व प्रदर्शनात मांडलेल्या पुस्तकांना भेट देऊन वाचनाचा आनंद घेतला.
0 टिप्पण्या