राष्ट्रीय किसान परिषदेचे अध्यक्ष अशोक पाटील हुड यांनी दिली माहिती...
पैठण प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास संस्था आणि राष्ट्रीय किसान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पैठण साठी शेतकरी हेल्पलाइन व समुपदेशन करून अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशासन अडचणीच्या ठिकाणी सहकार्य करून मदत करणार आहे. यात प्रत्येक गावात राष्ट्रीय किसान परिषदेची व ग्रामीण विकास संस्थेची हेल्पलाइन भिंतीवर छापने आणि हेल्पलाइन सेंटर सुरू करणे असा पायलट प्रकल्प असून त्याची सुरुवात लवकरच करण्यात येणार आहे. असे राष्ट्रीय किसान परिषदेचे अध्यक्ष अशोक पाटील हुड यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यापासून महाराष्ट्राला लागलेला शेतकरी आत्महत्यांचा डाग पुसून काढण्यासाठी देशात शेतकरी आत्महत्या होऊ नये म्हणून वेगवेगळ्या आणि विविध उपाय योजना राबविण्याचे काम शासन प्राधान्याने करीत असून हवामान अनुकूल शेती म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना तसेच जलयुक्त शिवार योजना सोलार कृषी पंप योजना जलसंधारणाच्या विविध योजना स्मार्ट प्रकल्प माननीय बाळासाहेब ठाकरे ग्रामीण परिवर्तन व कृषी व्यवसाय प्रकल्प राबविणे तसेच प्रलंबित असणाऱ्या सिंचनाच्या योजना प्राधान्याने पूर्ण करणे कृषी उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी चालना देणे यासह शासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत असून याचाच एक भाग म्हणून शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर पायलट प्रोजेक्ट म्हणून पैठण विधानसभा मतदारसंघात शेतकरी हेल्पलाइन सुरू करून विविध अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास संस्था आणि राष्ट्रीय किसान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक गावात राष्ट्रीय किसान परिषदेची व ग्रामीण विकास संस्थेची हेल्पलाइन भिंतीवर छापने आणि हेल्पलाइन सेंटर सुरू करणे असा पायलट प्रकल्प असून त्याची सुरुवात लवकरच करण्यात येणार आहे असे राष्ट्रीय किसान परिषदेचे अध्यक्ष अशोक पाटील हुड यांनी सांगितले आहे.


0 टिप्पण्या