पैठण प्रतिनिधी
दिलीप मोटे लिखित 'परिक्रमा माणदेशची' या त्यांच्या पहिल्या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन लेखक श्री शरद तांदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
न्यू इरा पब्लिकेशन हाऊस च्या माध्यमातून सर्वात कमी वेळात खपलेली ही कादंबरी असून परीक्रमा माणदेशची ही कादंबरी साता समुद्रापार गेल्याची भावना यावेळी शरद तांदळे यांनी व्यक्त केली.
माणदेश हा वाचक वर्गाच्या जिव्हाळ्याचा विषय असून दुष्काळी जगण्याच हृदण या कादंबरी मधून व्यक्त केले असून या कादंबरीस वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे लेखक श्री दिलीप मोटे यांनी सांगितले. तसेच लवकरच माणदेशची चित्तरकथा सांगणारे पुस्तकं प्रकाशित करणार असल्याचे सांगितले. या कादंबरीचे विक्री व्यवस्थापन पाहणारे श्री रत्नेश चोरगे यांनी या कादंबरीसाठी वाचकांच्या अतिशय चांगल्या प्रतिक्रिया येत असून एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी कादंबरी असल्याचे सांगून परिक्रमा माण देशची ही कादंबरी फ्लिपकार्ड ऍमेझॉन वर उपलब्ध असल्याचे सांगून 8830860267 या क्रमांकावर संपर्क केल्यास घरपोच मिळणार असल्याचे सांगितले यावेळी न्यू इरा पब्लिकेशन हाऊस चे रत्नेश चोरगे, प्रियांका सरोवर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

0 टिप्पण्या