पैठण प्रतिनिधी
पैठण एसटी आगरातील ६७ पैकी ४० बस या भंगार झाल्या होत्या बस मधून प्रवासी नेत असतांना बस बंद पडत होत्या. नाईलाजाने प्रवाशांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. आमदार विलास भुमरे यांनी दखल घेतल्यामुळे पैठण आगारात नवीन १० बस आल्याने आज दि. १४ शुक्रवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजु नाना भुमरे व शिवसेना युवानेते तथा पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे यांच्या हस्ते नवीन १० बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार पैठण आगार प्रमुख गजानन मडके यांच्या हस्ते करण्यात आला.
पैठण च्या आगरात अशोक लेलॅण्डच्या १०ही डिझेस बसेल दाखल झाल्या आहेत. या बसेस मोठ्या आकाराच्या असल्याने एसटीतील ग्रामीण भागातील वाहतूक फायद्याच्या ठरणार आहेत,एसटी महामंडळाच्या ताफ्यात साध्या डिझेल बसेस उपलब्ध झाल्या आहेत.पैठण एसटी बसच्या ताफ्यात नवीन १० बस उपलब्ध आहेत. यामुळे ग्रामीण भागातील वाहतूकीला नव्याने चालणा मिळणार आहे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष राजु नाना भुमरे, शिवसेनायुवा नेते तथा पाचोड, सरपंच शिवराज भुमरे, शिवसेना तालुकाध्यक्ष आण्णाभाऊ लबडे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, शेखर शिंदे, किशोर चौधरी, माजी नगरसेवक भुषण काका कुलकर्णी, विजय सुते, नंदु काका पठाडे, शहर प्रमुख तुषार पाटील, नाथ संस्थान चे अध्यक्ष दादा पाटील बारे, बाबुराव पडुळे,पोलीस निरीक्षक संजय देशमुख, अशोक एरंडे, माजी नगराध्यक्ष राजु गायकवाड, ज्योती पठाडे, वैशाली परदेशी,अमोल जाधव ,नामदेव खराद, संतोष बोठे, जनार्दन मिटकर, अमोल एरंडे, पैठण शहर व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष पवन लोहिया, बलराम लोळगे, राजु मानधणे, मिठु नाना नन्नवरे, पैठण आगार प्रमुख गजानन मडके, रविंद्र खिंडारी, राजु कोलते, संदिप धोकटे, रोहिदास सोंडगे, संतोष जोगस, ज्ञानेश्वर भाकड, माधव बडे,गणेश बनकर, राजु लोखंडे अदिंची उपस्थिती होती.
पैठणच्या एसटी आगरात जवळपास सर्व बस जुन्या झाल्याने आमदार विलास भुमरे यांच्या कडे आम्ही मागणी केली त्या अनुषंगाने बापू यांनी तात्काळ दखल घेत १० बस पैठणच्या आगराला उपलब्ध करुन दिल्या असल्याचे आता प्रवास सुखकर होईल.
- आमदार विलास बापू भुमरे
दहा लालपरी पैठण बसस्थानक ते छत्रपति शिवाजी महाराज चौक,गागाभट चौक सराफबाजर मार्गे पुन्हा बसस्थानक मध्ये आल्या या बस मध्ये पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजु नाना भुमरे पाटील,पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे,शिवसेना तालुकाप्रमुख आण्णासाहेब लबडे पाटील, शेखर शिंदे,किशोर चौधरी, नामदेव खराद,माजी नगरसेवक भुषण काका कुलकर्णी सह पत्रकार बांधव उपस्थित होते.

0 टिप्पण्या