शेवगाव
शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे संत भगवानबाबा यांच्या प्रेरणेतून आणि गुरूवर्य भिमसिंह महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या श्री गोपालकृष्ण जयंती उत्सवाचा शताब्दी महोत्सव यंदा ९ ऑगस्टपासून १६ ऑगस्टपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून जय्यत तयारी सुरू झाली आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.
या सप्ताहात दररोज पहाटे ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये काकड आरती, अधिष्ठान पूजन, विष्णुसहस्त्रनाम पठण, श्री ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, श्रीकृष्ण लीलामृत कथा, हरिपाठ, हरिकिर्तन, संगीत भजन आणि रात्र जागर यांचा समावेश आहे.
श्रीकृष्ण लीलामृत कथा हे प्रवचन दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली जोग महाराज (आळंदी) यांच्या अमृतवाणीतून होणार असून श्री ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व ह.भ.प. योगेश महाराज गोरे (आळंदी) व ह.भ.प. राजाराम महाराज काटे करणार आहेत.
कीर्तन सेवा दररोज सायंकाळी ७ ते ९ वाजता, तर संगीत भजन रात्री ९ ते ११ वाजता संपन्न होणार आहे.
नामांकित कीर्तनकारांचा सहभाग
या सप्ताहात सुप्रसिद्ध कीर्तनकारांच्या कीर्तन सेवा होणार असून त्यात सहभागी महाराजांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
- ९ ऑगस्ट: ह.भ.प. केशव महाराज नामदास (श्री संत नामदेव महाराज वंशज)
- १० ऑगस्ट: खान्देशरत्न वैराग्यमूर्ती ह.भ.प. तुकाराम महाराज जेऊरकर
- ११ ऑगस्ट: ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले (गाथा मंदिर, देहू)
- १२ ऑगस्ट: ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली (आळंदी)
- १३ ऑगस्ट: रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक (नागपूर)
- १४ ऑगस्ट: ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक (श्री नारायणगिरी आश्रम, नेवासा)
- १५ ऑगस्ट सकाळी: ह.भ.प. शब्दप्रेमी संग्रामबापू भंडारे (डोंगर, देहू)
- १५ ऑगस्ट रात्री: ह.भ.प. गुरूवर्य राम महाराज झिंजुर्के (श्री जोग महाराज संस्थान)
- १६ ऑगस्ट: सकाळी १० ते १२ भगवानगडचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसाद
संगीत सेवा आणि नामवंत कलाकारांचा सहभाग
संगीत भजन सेवा सुद्धा दररोज रात्री होणार असून विविध नामवंत गायक, वादक, कलाकार सहभागी होणार आहेत:
- ९ ऑगस्ट: ह.भ.प. राहुल महाराज खरे (गौरव महाराष्ट्राचा विजेता, इंडियन आयडॉल फेम)
- १० ऑगस्ट: ह.भ.प. चैतन्य महाराज देवढे (आळंदी, इंडियन आयडॉल फेम)
- ११ ऑगस्ट: सौ. ज्योती गोराणे, ह.भ.प. रामेश्वर देशमुख
- १२ ऑगस्ट: डॉ. निरज लांडे (अकोला), तबलासाथ: प्रसाद लोहार
- १३ ऑगस्ट: पं. कल्याणजी गायकवाड व कौस्तुभ गायकवाड
- १४ ऑगस्ट: पं. रघुनाथजी खंडाळकर, तबलासाथ: पांडुरंगजी पवार
- १५ ऑगस्ट: प्रा. राजेश सरकटे (छत्रपती संभाजीनगर), भक्तिगीत सादरीकरण
या सप्ताहाचे आयोजन ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के (श्री जोग महाराज संस्थान, आखेगाव) यांच्या नेतृत्वाखाली होत असून, सर्व भाविकांनी या सप्ताहात सहभागी व्हावे, दर्शन व कीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक व ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या