अहमदनगर

श्रीरामपूरमध्ये अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे भव्य अनावरण


श्रीरामपूर

श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. शहराच्या मध्यवर्ती शिवसृष्टी परिसरात जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन झाले, तसेच या वेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील देखील उपस्थित होते आणि नागरिकांची मोठी गर्दी या सोहळ्याला लाभली होती. सुमारे तीन दशकांपासून प्रलंबित असलेली आणि जागेच्या निश्चितीवरून दीर्घकाळ संघर्ष चालेला ही मागणी आता पूर्ण झाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी समन्वय साधून गती दिली, ज्यामुळे पुतळ्याचे बांधकाम आणि परिसराचा विकास त्वरित पूर्ण झाला आणि शहराला महाराजांचा हा बहुप्रतिक्षित भव्य पुतळा प्राप्त झाला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या