अहमदनगर

श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील विद्यालयात "गड किल्ले निर्मिती उपक्रम" उत्साहात संपन्न!

विद्यार्थ्यांनी साकारले आकर्षक किल्ले; किल्ले निर्मितीतून घेतला इतिहासाचा अनुभव!


नेवासा प्रतिनिधी

श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन व संवर्धन ऐतिहासिक वारशाविषयी आवड निर्माण करण्यासाठी किल्ले निर्मिती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर, आकर्षक व ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणारे किल्ले तयार केले.

या उपक्रमाच्या निमित्ताने पंचायत समिती, नेवासा येथील गटशिक्षणाधिकारी श्री शिवाजीराव कराड सर, केंद्रप्रमुख श्री राठोड सर, विद्यालयाचे प्राचार्य श्री.काळे सर,उपप्राचार्य श्री.म्हेत्रे सर,विभागप्रमुख श्री.पाटील सर व श्री.सोनवणे सर, कलाशिक्षक शेंडे सर तसेच मार्गदर्शक श्री.किशोर घाडगे.  श्री.निबे सर यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या किल्ल्यांचे मान्यवरांनी कौतुक केले. किल्ले निर्मितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व, त्यांची रचना आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी, वारसा स्थळांचा जतन व संवर्धन याविषयी जिज्ञासा निर्माण होते, तसेच त्यांच्या सर्जनशीलतेला आणि कलागुणांना प्रोत्साहन मिळते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा व कलाकौशल्याचा सुंदर आविष्कार घडवत एकापेक्षा एक आकर्षक किल्ले साकारले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून इतिहास समजून घेण्याचा आनंददायी अनुभव मिळाला.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा आणि ऐतिहासिक वारशाची जाणीव करून देणारा हा उपक्रम विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या