श्रीरामपूर
गेल्या पावसाळी अधिवेशनात तारांकित झालेल्या बेलापूर परळी रेल्वे मार्गाचा प्रश्न पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनात अतारांकित झाला आहे या अतारांकित प्रश्नात बेलापूर परळी रेल्वे मार्गाचे काय झाले असा थेट सवाल शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांना उपस्थित केला या प्रश्नावर केंद्रीय केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी बेलापूर परळी रेल्वे मार्गासाठी 338 हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले असून या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे या मार्गासाठी 3904 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी 50% खर्च राज्य शासन करण्यास तयार असल्याचे पत्र 2019 मध्ये रेल्वे बोर्डाला प्राप्त झाल्याचे सांगितले
यावर खासदार वाकचौरे व सेवा संस्थेचे सचिव रितेश भंडारी मन्सूर पटेल यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले निवेदनात आर ओ आर चे कारण देत या रेल्वे मार्गाला प्रलंबित ठेवल्याचे सांगितले राज्यात यापेक्षा जास्त तोट्यात आर ओ आर असणाऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे याकडे रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांचे लक्ष वेधले यावर त्यांनी रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असे सांगितले यावर खासदार वाकचौरे यांनी या मार्गासाठी सकारात्मकता दाखवून तातडीने मंजुरी देण्याची आग्रही मागणी केली तसेच नगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांनीही निवेदनाद्वारे बेलापूर परळी रेल्वे मार्गाची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांच्याकडे केली आहे
बेलापूर परळी रेल्वे मार्गाला ब्रिटिश काळात मंजुरी मिळालेली आहे राजकीय अनास्था व जनरेटा अभावी हा रेल्वे मार्ग मागे पडत आहे या रेल्वे मार्गासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आश्वासन दिले आहे त्यांनी ते पूर्ण करणे अपेक्षित आहे
- प्रा ॲड आदिनाथ जोशी
अध्यक्ष - ॲंकर्स असोशिएशन, श्रीरामपूर
रेल्वे कृती समितीने अद्याप पर्यंत ममता बॅनर्जी पवन कुमार बंसल मुकुल रॉय मनोज सिन्हा सुरेश प्रभू पियुष गोयल रावसाहेब दानवे व्ही सदानंद गौडा अश्विनी वैष्णव इ रेल्वे मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत यापैकी एकाही रेल्वेमंत्र्यांनी या रेल्वे मार्गाला न्याय दिलेला नाही या रेल्वे मार्गाचे पूर्णत्वासाठी अजून किती अंत सरकार बघणार आहे
- विजय बोरा व्यापारी
शेवगाव

0 टिप्पण्या