शैक्षणिक सहली निमित्त औरंगाबाद विमानतळ,देवगिरी किल्ला,वेरूळ लेणी, सिद्धार्थ उद्यान,बीबी का मकबराला भेट
भालगाव प्रतिनीधी
वेलकम टू इंडिया..!! तुम्ही कसे आहात? भारत तुम्हाला आवडला का? तुम्ही कोणकोणत्या ठिकाणांना भेटी दिल्यात? यांसारखी विविध प्रश्न इंग्रजीतून नेवासे तालुक्यातील जिल्हा परिषद भालगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी थायलंड देशातील विदेशी पर्यटकांची वेरूळ लेणी पाहताना प्रश्न विचारात इंग्रजी व हिंदी भाषेतून संवाद साधला. निमित्त होते ते जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा भालगाव येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल अलीकडेच उत्साहात पार पडली.
या सहलीत विद्यार्थ्यांनी महामंडळाच्या बसने प्रवास करत छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळ, ऐतिहासिक देवगिरी किल्ला, जागतिक वारसा स्थळ वेरूळ लेणी आणि सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालय, सर्पोद्यान, मत्स्यालय आणि बीबी का मकबरा या स्थळांना शैक्षणिक सहली द्वारे क्षेत्रभेट घेऊन माहिती घेतली.
या शैक्षणिक सहलीचे आयोजन गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, विस्तार अधिकारी रुकसाना शेख,केंद्रप्रमुख बाळासाहेब काशीद,मुख्याध्यापिका सरिता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या एकदिवसीय सहलीमुळे विद्यार्थ्यांना इतिहास, कला आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवला.औरंगाबाद विमानतळावर विमानाचे लँडिंग व तेथील सुरक्षा यंत्रणा अनुभवली. देवगिरी किल्ल्याचा शौर्य गौरवशाली इतिहास, वेरूळ लेणीतील शिल्पकलेची अप्रतिम उदाहरणे आणि प्राणी संग्रहालयातील विविध प्रजातींची माहिती यामुळे विद्यार्थ्यांचा ज्ञानसाठा समृद्ध झाला.
यावेळी थायलंड येथील विदेशी पर्यटकांसोबत शिक्षकांनी देखील संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांना विदेशी पर्यटक त्याचबरोबर विदेशी चलन,त्यांचा ध्वज तसेच त्या देशाबद्दल माहिती सहलीतील इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना समजली. यावेळी थायलंडच्या विदेशी पर्यटकांना विद्यार्थ्यांसोबत सहलीचा फोटो देखील काढण्याचा मोह आवरता आला नाही.
या सहलीचे नेतृत्व पदवीधर शिक्षक राहुल आठरे, शिक्षक अमोल तुपे, राज्य आदर्श शिक्षिका शितल झरेकर, शिक्षिका जनाबाई जाधव, पल्लवी तरवडे यांनी करत प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांना माहिती दिली. सहलीचे यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश तनपुरे, उपाध्यक्ष स्वाती खरात, सर्व सदस्य,पालक,ग्रामस्थ तसेच प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल ताके, एसटीचे आगार प्रमुख प्रशांत होले, ज्ञानेश्वर मुरदारे,सहल प्रमुख गणेश कोटस्थाने,चालक अनिल नन्नवरे आदींचे प्रयत्न लाभले.

0 टिप्पण्या