अहमदनगर

मध्य प्रदेश: दोन मित्रांचे नशीब पालटले! जमिनीतून मिळाला १५.३४ कॅरेटचा मौल्यवान हिरा


मध्य प्रदेश

मध्य प्रदेशातील पन्ना येथे दोन खास मित्रांचे नशीब एका क्षणात पालटले आहे. त्यांना जमिनीतून १५.३४ कॅरेटचा एक अत्यंत मौल्यवान हिरा मिळाला आहे, ज्याची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. या हिऱ्यामुळे या दोन्ही मित्रांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले आहे.

एक काळ असा होता की या दोन मित्रांची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक होती आणि कुटुंबाचा खर्च चालवणेही कठीण होते. पण आता हा हिरा मिळाल्यामुळे त्यांचे चांगले दिवस आले आहेत. हे दोन्ही मित्र रानीगंजचे रहिवासी आहेत. यापैकी एक मांस विक्रीचे दुकान चालवतो, तर दुसरा फळांच्या स्टॉलवर काम करतो.

नेमके काय आहे प्रकरण?

पन्ना जिल्ह्याच्या रत्नगर्भा भूमीने पुन्हा एकदा दोन तरुणांचे भाग्य बदलले आहे. शहरातील रानीगंज मोहल्ल्यात राहणारे सतीश खटीक आणि त्यांचा मित्र साजिद मोहम्मद यांना १५.३४ कॅरेटचा मौल्यवान 'जेम क्वालिटी' हिरा मिळाला आहे. याची किंमत सुमारे ५० लाख रुपये इतकी असल्याचा अंदाज आहे. सतीश आणि साजिद यांनी कृष्ण कल्याणपूर येथील उथळ खाणीत महिनाभर केलेल्या कठोर परिश्रमानंतर हा हिरा त्यांना मिळाला आहे.

हिरा सापडल्यानंतर, सतीशने तो हिरा कार्यालयात जमा केला आहे. हा हिरा आगामी लिलावात ठेवला जाईल. त्यानंतर, सरकारी कर वजा करून उर्वरित रक्कम या तरुण मजुरांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

सतीशने सांगितले की, त्यांनी १४ नोव्हेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी खाणीचे पट्टा (लीज) घेतले होते. त्यांच्या घराची आर्थिक स्थिती खूपच कमकुवत होती आणि संपूर्ण कुटुंबाचा खर्च मजुरीवर चालत होता. पण आता या हिऱ्यामुळे त्यांचे जीवन बदलणार आहे. लिलावातून मिळणाऱ्या रकमेतून ते आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करतील आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करतील, असे सतीशने सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील पन्ना येथे केवळ २० दिवसांपूर्वीच कृष्णा कल्याणपूर येथे या दोन खास मित्रांनी खाणकाम सुरू केले होते. या मित्रांची ओळख २४ वर्षीय सतीश खटीक आणि २३ वर्षीय साजिद मोहम्मद अशी आहे. त्यांना या वर्षातील सर्वात मोठा आणि तेजस्वी १५.३४ कॅरेटचा ‘जेम्स क्वालिटी’ हिरा मिळाला, ज्याची अंदाजित किंमत ५० लाख रुपयांहून अधिक आहे. साजिदचे आजोबा आणि वडिलांनीही दशके नशीब आजमावले, पण त्यांना फक्त लहान यश मिळाले. मात्र या मुलांनी अवघ्या २० दिवसांत इतिहास रचला! लिलावातून मिळणारी रक्कम दोघांनी समान वाटून घेऊन, प्रथम बहिणींचे लग्न करायचे आणि उर्वरित पैसे आपल्या व्यवसायात गुंतवायचे, असे ठरवले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या