श्रीरामपूर
श्रीरामपूर शहरात आज दुपारी गोळीबाराची एक हादरवणारी घटना घडली आहे. शहरातील बंटी जहागीरदार यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला, ज्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंटी जहागीरदार हे कब्रस्तानातून काम संपवून बाहेर पडत असताना, जर्मन हॉस्पिटलसमोर मुख्य गेटजवळ दबा धरून बसलेल्या अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरात मोठी पळापळ झाली. हल्ला करून आरोपी घटनास्थळावरून लगेच पसार झाले असून, पोलीस सध्या त्यांचा कसून शोध घेत आहेत. या गोळीबारात बंटी जहागीरदार यांना तीन गोळ्या लागल्याची चर्चा आहे, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर येथे हलवण्यात आले आहे.

0 टिप्पण्या