अहमदनगर

यूपीच्या हरदोईत प्राचीन मंदिरात तोडफोड, मूर्ती आणि हवनकुंड केले उद्ध्वस्त


उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून मंगळवारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील टिकारी गावात असलेल्या माँ गोवर्धनी मंदिरामध्ये कथितरीत्या तोडफोड करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातील मूर्ती आणि हवनकुंड उद्ध्वस्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत घटनेतील आरोपीला ताब्यात घेतले आहे.

नेमके काय घडले?

ही संपूर्ण घटना हरदोई जिल्ह्यातील कछौना पोलिस स्टेशनच्या हद्दीतील टिकारी गावात घडली आहे. पोलिसांनी मंगळवारी माहिती दिली की, गावातील माँ गोवर्धनी मंदिरात तोडफोड केल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव संदीप असून तो टिकारी गावातीलच रहिवासी आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीला ताब्यात घेऊन या प्रकरणावर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

पोलिसांनी काय सांगितले?

मंदिरामध्ये झालेली ही तोडफोड सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संपूर्ण घटनेवर पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात पुढील आवश्यक कारवाई केली जात आहे. हरदोई येथील टिकारी गावात असलेले माँ गोवर्धनी मंदिर एक प्राचीन मंदिर आहे. दूरदूरवरून भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.

तोडफोड कशी उघडकीस आली?

हरदोई जिल्ह्यातील टिकारी गावातील माँ गोवर्धनी मंदिराची देखरेख गावातील सामाजिक कार्यकर्ते आरबी सिंह तोमर आणि बबलू सिंह करतात. जेव्हा बबलू सिंह आणि रोशन वर्मा दर्शनासाठी मंदिरात गेले, तेव्हा तोडफोडीची ही घटना उघडकीस आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या