श्रीरामपूर
श्रीरामपूर शहरातील नेवासा रोडवरील ओव्हरब्रिजवर आज शुक्रवारी एक भयानक अपघात झाला. नेवाशाच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या एका ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली, यात दुचाकीवर असलेल्या मीना राजेंद्र सोनार (वय अंदाजे ६० वर्षे, रा. गोपीनाथ नगर, श्रीरामपूर) या महिलेचा जागेवरच दुर्दैवी अंत झाला. मीना सोनार आणि त्यांचे पती राजेंद्र नारायण सोनार हे त्यांच्या नातवाच्या वाढदिवसासाठी चांदा येथे जात असताना हा अपघात झाला. ट्रक क्रमांक MH 41 AU 9267 ने त्यांच्या TVS हेवी ड्युटी दुचाकी क्रमांक MH 17 AD 4587 ला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की मीना सोनार यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती राजेंद्र सोनार हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे ओव्हरब्रिजवर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक काही काळ पूर्णपणे थांबली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला असून, संबंधित ट्रकचालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आणि नागरिकांनी वाहतूक व्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.

0 टिप्पण्या