श्रीरामपूर
आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने एक भव्य रूट मार्च काढण्यात आला. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मार्चमध्ये ६ अधिकारी, १५ पोलीस अंमलदार, १ आरसीपी पथक आणि १६ होमगार्ड अशा एकूण ५५ पोलीस जवानांनी सहभाग घेतला होता. या रूट मार्चची सुरुवात शहरातील महात्मा गांधी चौक येथून झाली. त्यानंतर गिरमे चौक, मेन रोड, भगतसिंग चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि दशमेश चौक अशा प्रमुख मार्गांवरून फिरत वार्ड क्रमांक २ मधील मौलाना आझाद चौक येथे या मार्चची सांगता करण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आलेल्या या संचलनामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी सण सर्वांनी शांततेत, एकोप्याने आणि उत्साहात साजरा करावा, तसेच पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन याप्रसंगी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या