अहमदनगर

सुरतमध्ये दोन बसेसचा भीषण अपघात; ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू, गुजरात-महाराष्ट्र महामार्गावरील घटना


सूरत

गुजरात-महाराष्ट्र महामार्गावर सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यात दोन बसेसचा अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारा अपघात झाला आहे. या दोन बसेसमध्ये झालेल्या जोरदार धडकेत आतापर्यंत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. सुरत ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राजेश गढिया आणि स्थानिक अग्निशमन विभागाने या भीषण अपघाताच्या वृत्ताला आणि मृत्यूच्या आकड्याला अधिकृतपणे दुजोरा दिला आहे.

हा भीषण अपघात नेमका कशामुळे आणि कसा घडला, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि मदत पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पोलीस प्रशासनाकडून अपघातातील मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम वेगाने सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या