अहमदनगर

श्रीरामपुरात हॉटेल व्यावसायिकाची निर्घृण हत्या; निषेधार्थ आजपासून शहर बेमुदत बंद


श्रीरामपूर

श्रीरामपूर शहरातील नेवासा रस्त्यावरील 'हॉटेल लक्ष्मीनारायण पॅलेस'मध्ये शनिवारी दुपारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. जेवणाच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून काही नशेत असलेल्या तरुणांनी हॉटेल व्यावसायिक आकाश शेखर दुबैया (वय ३५) यांच्यावर धारदार शस्त्राने आणि काचेच्या टिपॉयने जीवघेणा हल्ला केला. या भीषण हल्ल्यात आकाश यांचा जागीच मृत्यू झाला. मृत आकाश हे माजी नगरसेवक शेखर दुबैया यांचे सुपुत्र होते. या घटनेत शेखर दुबैया आणि त्यांचे पुतणे कुणाल दुबैया हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे संपूर्ण शहरात आणि व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, डीवायएसपी जगताप भवर आणि पोलीस निरीक्षक विशाल क्षीरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत ओमकार डफाळ, सूरज जाधव आणि यश जाधव या तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मर्चंट असोसिएशनने आज रविवारपासून श्रीरामपूर शहर बेमुदत बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या