अहमदनगर

रक्त तपासणीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला डॉक्टरांनी घोषित केले गरोदर; केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाचा धक्कादायक प्रकार


कल्याण

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालय पुन्हा एकदा मोठ्या वादात सापडले आहे. हिमोग्लोबिन कमी असल्याने उपचारासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीची पालकांना पूर्वकल्पना न देताच गरोदरपणाची चाचणी करण्यात आली. रुग्णालयात सलग तीन वेळा केलेल्या चाचणीत तिची रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले, ज्यामुळे मुलगी आणि तिचे कुटुंब प्रचंड मानसिक धक्क्याखाली आले. मात्र, संशय आल्याने कुटुंबाने बाहेरून चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. या धक्कादायक प्रकारानंतर भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणाची दखल घेत केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी चौकशी समिती स्थापन केली असून, दोषींवर कडक कारवाईचा इशारा आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी दिला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या