मुंबई
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार पराग शाह यांनी एक दिवस अत्यंत गरिबीत जगण्याचा आणि रस्त्यावर भीक मागून जेवण्याचा अनोखा अनुभव घेतला आहे. घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि ३४०० कोटींहून अधिक संपत्तीचे मालक असलेले पराग शाह एका धार्मिक व सामाजिक प्रयोगासाठी भिकाऱ्याचा वेश परिधान करून रस्त्यावर उतरले होते. मेकअपच्या माध्यमातून स्वतःचे रूप बदलल्यामुळे आणि आपली सुरक्षा व्यवस्था बाजूला ठेवल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फिरताना त्यांना कोणीही ओळखू शकले नाही.
जैन धर्मातील चातुर्मासादरम्यान त्यांचे गुरू नम्रमुनि यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पराग शाह यांनी हा निर्णय घेतला होता. सामान्य भिकाऱ्याच्या जीवनातील अडचणी जवळून समजून घेण्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी जाऊन भिक्षा मागितली आणि त्यातूनच आपले भोजन मिळवले. नंतर त्यांनी आपली खरी ओळख स्पष्ट करून लोकांशी संवाद साधत आपला अनुभव शेअर केला. एका दिवसाच्या या प्रयोगाने समाजातील एका घटकाची बिकट परिस्थिती खरोखर समजून घेता येते का, या मुद्द्यावरून आता या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.

0 टिप्पण्या