मुंबई
तैवानमधील बहुराष्ट्रीय लॅपटॉप ब्रँड आसूसने आता आणखी एक नवी सुरुवात केली आहे. व्यावसायिक पीसी क्षेत्रात प्रवेश करण्याची कंपनीने घोषणा केली. मायक्रो बिझनेस, एसएमबी आणि मोठ्या एंटरप्राइझ ग्राहकांसह सर्व आकाराच्या व्यवसायांना सुविधा पुरवत आसूस त्यांच्या गरजांनुसार तंत्रज्ञानाच्या गरजा पूर्ण क रेल. सर्व महत्त्वाच्या विभागांमधील उत्पादनांत नोटबुक्स, डेस्कटॉप, ऑल इन वन्स आणि मोबाइल वर्कस्टेशन्स इत्यादी उत्पादनेही या ब्रँडद्वारे लाँच केली जातील. नवीनतम प्रोसेसरसोबत उत्पादनांची श्रेणी आणण्यासाठी ब्रँड मायक्रोसॉफ्ट आणि इंटेलसोबत एकत्र काम करेल. या उत्पादनांसह, आसूस वॉरंटी एक्सटेंशन पर्याय, अॅक्सिडेंटल डॅमेज प्रोटेक्शन, हार्ड डिस्क रिटेंशन सर्व्हिस आणि प्रायोरिटी सर्व्हिस यासारख्या उद्योगांसाठीच्या मूल्यवर्धित सेवाही दिल्या जातील.

0 टिप्पण्या