अहमदनगर

महिलेसोबत अश्लील व्हिडिओ बनवणारा किर्तनकार रंगेल बाळकृष्ण महाराज मोगलला अटक


गंगापूर प्र्तिनिधी । विजय बन्सोड

औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध किर्तनकार महाराजाचा एका महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ ९ एप्रिल रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी वारकरी संप्रदाय संघटनेकडून संबंधित किर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. आज अखेर या रंगेल मोगल महाराजाला शिल्लेगाव पोलीसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.

काय आहे प्रकरण….!

गेली अनेक वर्षे औरंगाबादसह मराठवाड्यात प्रतिष्ठीत किर्तनकार म्हणून ओळख असलेल्या या महाराजाचा महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ ९ एप्रिल रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून त्यांना मानणाऱ्या भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली होती. हे महाराज आणि व्हिडिओमध्ये दिसणारी महिला गेल्या अनेक दिवसांपासून कीर्तन करतात. त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. दोघांचे युट्यूबवर लाखो फॉलोअर्सवर आहेत. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांचा भक्तांना मोठा धक्का बसला असून संतापाची लाट उसळली. या किर्तनकार महाराजाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी व्हिडिओमध्ये असलेल्या किर्तनकार महाराज आणि महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली होती. याबाबत शिल्लेगाव पोलीस ठाण्यात त्यांनी रितसर तक्रार दिली होती. अखेर शिल्लेगांवचे पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर व पोहे का हनुमान सातपुते  यांनी महाराजाला आज अटक केली व गंगापूर येथील न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.

त्या किर्तनकार महिलेने घेतले होते विष

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रसिद्ध कीर्तनकाराच्या अश्लील व्हिडिओतील महिला किर्तनकाराने बदनामीला घाबरून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. औरंगाबादेतील एका खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले होते.

गेली अनेक वर्षे पंचक्रोशीत कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले 48 वर्षीय कीर्तनकार आणि सिल्लोड तालुक्यातील चाळीस वर्षीय महिला कीर्तनकार या अश्लील व्हिडिओ क्लिपमध्ये नको त्या अवस्थेमध्ये दिसत आहेत. सदरील व्हिडिओ हा महाराजांनी स्वत:च चित्रित केल्याचेही या चित्रफितीमध्ये पाहायला मिळत आहे. अशा प्रकारचे दोन व्हिडीओ सध्या समाजमाध्यमावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. सदरील व्हिडीओ क्लिपमध्ये दिसणारी महिला ही देखील महाराज आहे ती ज्या परिसरात राहते त्या परिसरात अनेक लोक तिला मानतात. त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. तर दोघांचे युट्यूबवर मोठे फॉलोअर्सवर सुद्धा आहेत. मात्र त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांच्या भक्तांना मोठा धक्का बसला असून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. आपली बदनामी होत असल्याचे लक्षात येताच त्या किर्तनकार महिलेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या