अहमदनगर

पाडळी शिंदे येथे"ई पीक पाहणी"मार्गदर्शन

तलाठी मंडळ अधिकारी पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दाखविले पीक नोंदणीचे प्रात्यक्षिक


पाडळी शिंदे प्रतिनिधी । स्वप्नील शिंदे

देऊळगाव राजा तालुक्यातील व अंढेरा मंडळात येणाऱ्या पाडळी शिंदे येथे आज ४ ऑगस्ट रोजी "माझा पीक पेरा मी नोंदविणार" या अभियान अंतर्गत  शेतकरी वर्गांना शासनाकडून मागील वर्षी पासून प्रत्यक्ष शेतात पेरलेला मालाचा पिक पेरा अचूक  नोंदविण्यात यावी म्हणून ई पीक पाहणी या अँप मधून अँडरौईड फोन मधून नोंदविणे आवश्यक आहे परंतु या वर्षी सदर अँप मध्ये  सुधारणा करून प्रत्यक्ष व अचूक पेरा नोंदविण्यासाठी ईपीक पाहणी व्हर्जन २ हे अँप विकसित करण्यात आले व १ ऑगस्ट पासून त्यात अक्षांश रेखांश सह बिनचूक पीक पेरा नोंदविणे आवश्यक आहे व सदर अँप ची माहिती व अचूक पेरा व अँप हाताळणी मोबाईल लोकेशन आदी माहिती व प्रत्यक्ष शेतकऱ्यांना बांधावर जाऊन ई पीक पाहणीचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन मंडळ अधिकारी भगवान पवार व तलाठी मदन जारवाल यांनी पाडळी शिंदे येथील शेतकऱ्यांना  केले. यावेळी कोतवाल भगवान ढोले, गुलाबराव शिंदे, राजू ठेंग,शंकर शेळके,विनोद शिंदे, अविनाश शिंदे, भास्कर शिंदे,दगडुबा जाधव, रवी वायाळ, सतीश शिंदे, विठ्ठल शिंदे, अंकुश शिंदे, दत्तात्रय शिंदे, पांडुरंग शेळके, स्वप्नील शिंदे यांच्या सह इतरही शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी मंडळ आधिकारी पवार व तलाठी मदन जारवाल यांनी अचूक व प्रत्यक्ष शेतात पेरलेले पीक व विमा भरलेल्या शेतकरी वर्गांनी पीक तारीख व मोबाईल लोकेशन आदी सर्व माहिती अचूक भरावी असे आवाहन सुद्दा त्यांनी केले. तसेच व्हिडीओ द्वारे सुद्दा अँप डाऊनलोड सह प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या