अहमदनगर

साताऱ्यात स्टंटचा अतिरेक; कार ३०० फूट दरीत कोसळली, युवक गंभीर जखमी

 


सातारा 

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याजवळील गुजरवाडी घाटात एका युवकाने स्टंट करत असताना आपली कार ३०० फूट दरीत घसरून फेकली गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघाताचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

ही घटना बुधवारी पाटण-सदावघपूर-तराळे मार्गावरील महावशी गावाजवळ घडली. साहिल अनिल जाधव (वय २०, रा. कपिल गोळेश्वर, ता. कराड) असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. तो मित्रांसह सदावघपूर परिसरात फिरायला आला होता. तेथे असलेल्या टेबल पॉइंटवर स्टंट करताना त्याचा कारवरील ताबा सुटला आणि कार थेट दरीत कोसळली.

साहिल जाधव कारमध्ये बसून फोटो घेत असताना अचानक कार मागे वळवण्याचा प्रयत्न करताना ब्रेक न लागल्याने ती घसरून सरळ दरीत कोसळली. अपघातस्थळी उपस्थित असलेल्या पोलिस प्रशिक्षणार्थी आणि रेस्क्यू पथकाच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने कन्हड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

या घटनेमुळे पर्यटनस्थळी सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने या टेबल पॉइंटजवळ सुरक्षिततेच्या उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या