अहमदनगर

सिने अभिनेत्री मधु कांबीकर यांना सिने अभिनेत्री पुरस्कार जाहीर ....


कांबी प्रतिनिधी - अमोल म्हस्के 

शेवगाव तालुक्यातील कांबी येथील रहीवाशी असलेल्या सिनेअभिनेत्री मधु कांबीकर यांना सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिला जाणारा २०१९ चा मराठी चित्रपट क्षेत्रासाठी दिला जाणारा राज्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अभिनेत्री मधूताई कांबीकरांनी तब्बल चार दशके कलेची सेवा केली. कलेचा त्यांचा प्रवास हा लावणी, लोकनाट्य, चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिका पुन्हा लोकरंगमंच अशा विविध अंगानं बहरलेला राहिला. नागर रंगभूमी व ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या या अभिनेत्रींचे स्थान निश्चित वाखाणण्यायोग्य आहे. मान – सन्मानाचे पुरस्कार व प्रसिद्धी मिळूनही त्यांनी सखी माझी लावणी या कार्यक्रमाचे  प्रयोग अमेरिका, अबुधाबी, दुबई, मॉरिशियस अशा देशात करून मराठी मनाच्या लावणीस बहुमान प्राप्त करून दिला. शब्दप्रधान लावणीनृत्य सादर करून शब्दांना अर्थवाही केले. पूरक मुद्राभिनय आणि आंगिक अभिनयानं फुलवण्याचे कसब मधू कांबीकरानी करून दाखवले. या सर्व कामांची पावती म्हणून त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच पुन्हा त्यामध्ये आनखी एक पुरस्काराची भर पडली आहे तो म्हणजे सन २०१९ च्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी त्याची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे विविध मान्यवर कडुन अभिनंदन करण्यात आले. त्यामध्ये शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे तसेच कांबी चे सरपंच नितीश पारनेरे ,केदारेश्वर सहकारी कारखान्याचे जेष्ठ संचालक सुरेशचंद्र होळकर , सामाजिक कार्यकर्ते लहु पाटील मडके ,डॉ सतिश मनचुके, डॉ. अरुण भिसे, पत्रकार अमोल म्हस्के, कांबी हायस्कूल कांबी चे मुख्याध्यापक अरुण वावरे व गावातील तरुणांनी दिवसभर सोशल मीडियावर स्टेट्स ठेवुन अभिनंदन केले अशा विविध माध्यमातून व क्षेत्रातून त्याचे कांबी  ग्रामस्थांच्या वतिने अभिनंदन करण्यात आले .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या