अहमदनगर

कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भुवनेश्वर

पृथ्वी-2 या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची बुधवारी ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी रेंजवरून यशस्वी चाचणी घेण्यात आली. पृथ्वी-२ क्षेपणास्त्र ही सुस्थापित प्रणाली भारताच्या आण्विक प्रतिकारशक्तीचा अविभाज्य भाग आहे. डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने विकसित केलेल्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चाचणी ITR संकुलातील मोबाईल लाँचरवरून करण्यात आली. आयटीआरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्षेपणास्त्राचा वापर युद्धक्षेत्रातील सामरिक शस्त्र म्हणून केला जाऊ शकतो. 500 किलो वॉरहेडसह त्याची रेंज 350 किमी आहे आणि पेलोड 1,000 किलोपर्यंत वाढवता येऊ शकतो. इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम (IGMDP) अंतर्गत वेगवेगळ्या टप्प्यांवर विकसित होत असलेल्या पाच क्षेपणास्त्रांपैकी पृथ्वी हे एक आहे. पृथ्वी-2 क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणप्रसंगी डीआरडीओचे अनेक शास्त्रज्ञ आणि आयटीआरचे अधिकारीही उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या