अहमदनगर

लताबाई काकडे यांचे निधन


शेवगाव प्रतिनिधी
 

तालुक्यातील बोधेगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य नितीनराव काकडे यांच्या मातोश्री श्रीमती लताबाई मनोहर काकडे (माई)यांचे आज बुधवारी पहाटे 3. 30 वाजण्याच्या सुमारास  दुःख निधन झाले आहे मृत्यू समयी त्या 74 वर्षाच्या होत निधना बद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

बोधेगाव च्या सामाजिक राजकीय, धार्मिक सह आदी क्षेत्रातील जडघडणीत त्याचा मोठा वाटा होत त्या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत पाठीमागे विवाहित एक मुलगा, सून, नातू, नात, पणतू असा मोठा परिवार आहे अत्यंत शोकाकुल वातावरणात बोधेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी सर्व क्षेत्रातील मोठा समुदाय उपस्थित होता.

 यावेळी हभप बापूसाहेब महाराज माटेगावकर, हभप पांडुरंग महाराज झुंबड, बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, माजी सरपंच रामजी अंधारे, भाऊसाहेब पोटभरे, शाहू खंडागळे, महादेव पोटभरे, कुंडलिक घोरतळे, विठ्ठल कापसे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. तसेच निधना बद्दल बोधेगाव येथील व्यापाऱ्यांनी उस्फूर्तपणे 11 वाजेपर्यंत सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या