पैठण प्रतिनिधी
पैठण छत्रपती संभाजीनगर राजमार्गावरील पिंपळवाडी पि. येथील गंगवाल दवाखान्यासमोरील मुख्य वाहतूक रोडचे नुकतेच काम झालेले असतांना या रोडवरील डाव्या बाजुच्या रोडवरुन शाळेची बस जात असतांना तेथील काम अतिशय खराब झाल्यामुळे गाडीचे मागील चाक अचानकपणे खड्यात गेल्याने गाडी फसल्यामुळे पुढे निघु शकली नाही. जवळपास अनेक तास गाडी तशीच खड्ड्यात अडकून राहिली. त्यामुळे या बस मधील मुलांना उतरून घेण्यात आले पैठण येथील जैन इंग्लिश स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांना जोडायला जातांना हा प्रकार घडला. विद्यालयातील मुलांसाठी हि छोटी मिनी बस वापरली जाते.
पैठण हे तिर्थक्षेत्र असल्यामुळे देशभरातुन भाविक वर्ग विशेष गाड्यांनी येतात. अचानकपणे रोडवरुन जातांना गाड्या खड्ड्यात फसत असल्यामुळे झालेल्या रोडच्या कामावर प्रशचिन्ह निर्माण झाले आहे. या कामावर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलिप स्वामी यांनी नाराजी व्यक्त केली होती.
काही महिन्यापुर्वी पैठण ते संभाजीनगर चौपदरीकरण रोडचे काम हाती घेण्यात आले असून ते जवळपास 75 टक्के पुर्ण झालेले आहे पिंपळवाडी पि. येथील रोड पुर्णतः चांगला झाल्यामुळे या रोडवरुन अहमदनगर, शेवगाव, पैठणच्या दक्षिण भागातील रहिवासी वाहनाने या रोडवरुन ये जा करतात. असे असतांना शाळेची गाडी रोडवर अचानक निकृष्ट झालेल्या जागेत गाडी फसली आणि गाडीचे चाक जवळपास तीन फुट खाली गेल्याचे पहावयास मिळाले. हा रोड खरच चांगला, दर्जेदार गाड्यांचा नुकसान न करणारा व प्रवाशांना दुखापत न करणारा झाल्याचे प्रमाणपत्र स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसील महसूल विभाग, पोलीस प्रशासनाला या रोडची तज्ञांकडून अहवाल घ्यावा व तसेच प्रवाशांनी ही तसे प्रमाणपत्र संबंधीत ठेठेदारांकडुन घ्यावी अशी केली जात आहे
0 टिप्पण्या