बोधेगाव
तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव शिवारात ८ ऑगस्ट रोजी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह शेतात आढळला. सुरुवातीला अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र मृताच्या डोक्यावर मारहाणीच्या जखमा असल्याने संशय वाढला.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. तांत्रिक तपासातून मृताची ओळख आकाश लक्ष्मण किडमिचे (२०, रा. रामनगर, शेवगाव) अशी पटली.
तपासात विजय चंदर किडमिचे (२०) व अरुण लाला उपदे (१९), दोघेही रा. रामनगर, शेवगाव, हे आरोपी असल्याचे समोर आले. शिकारीसाठी गेलेल्या तिघांमध्ये शिवीगाळ झाली आणि लोखंडी गजाने मारहाण करून आकाशचा खून करण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली.
मृतदेह सापडल्यापासून केवळ १२ तासांत आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पुढील तपासासाठी शेवगाव पोलीस स्टेशनकडे सुपूर्द केले आहे.
0 टिप्पण्या