चर्चमध्ये जाण्याचे बंद केल्याने जीवे मारण्याची धमकी शेवगाव पोलीसात गुन्हा दाखल
बोधेगाव प्रतिनिधी
पुतण्याचा आजार बरा करतो असे सांगून एका महिलेस चर्चमध्ये बोलावून प्रार्थना करायला व .ख्रिश्चन धर्मा प्रमाणे रहायला सांगून नातेवाईकांनाही चर्चमध्ये यायला लावले. दरम्यान तिचेसी अश्लिल वर्तन करणाऱ्या,अनेक दिवस खेट्या घालूनही गुण नसल्याने चर्चमध्ये जाणे बंद केल्यावर तीला जीवे मारण्याची व खोट्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देणाऱ्या शेवगाव येथील आखेगाव रोडवरील 'आशीर्वाद प्रार्थना भवन होली स्पिरीट जनरेशन चर्चचा प्रमुख प्रदीप प्रभाकर कोल्हे याचे विरुद्ध अखेर पिडीत महिलेने गेल्या सोमवारी चार ऑगस्टला शेवगाव पोलिसात गंभीर आरोप करत फिर्याद दाखल केली आहे या घटनेबाबत परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे .
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपला पुतण्या हा २०१४ पासून आजारी असून प्रदीप कोल्हे याने आपल्या घरी येऊन आपण त्यास बरा करतो त्यासाठी तुम्ही चर्चमध्ये या. प्रार्थना करा ख्रिश्चन धर्माप्रमाणे रहा असे सांगितले. त्याच्या ब-या होण्याच्या आशेने आपण कुंटुबासह त्याच्या चर्चमध्ये जाण्यस सुस्वात केली. प्रदीप कोल्हे यानी उपचार करण्याच्या बहाण्याने आपल्या विश्वासाचा फायदा घेत चर्च मध्ये डोळे बंद करण्याचे सांगून पिडीतेच्या पाठीवर, मानेवर हात फिवणे पदर काढणे व हात पकडणे अशी लजास्पद कृत्ये केली. त्याचप्रमाणे नातेवाईकांना देखील चर्चमध्ये आणा, नाही तर उपचार करणार नाही. असे म्हणत धार्मिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. जेव्हा पिडित कुटुंबाने चर्चमध्ये जाणे बंद केले तेव्हा आरोपी कोल्हे याने अत्यंत घाण शिविगाळ करत आपणास जिवे मारण्याची तसेच खोट्या गुन्हयात अडकवण्याची धमकी दिली असे सदर महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
0 टिप्पण्या