पैठण प्रतिनिधी
विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचालित आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषदेचे संचालक प्रा. संतोष पा. तांबे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विशाल पा. तांबे, प्राचार्य आर.बी. रामावत, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका एम.के. कोळगे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रथम राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रज्ञा हक्कम हिने स्वागत गीत गायले.प्रा. संतोष पा. तांबे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देत आपली आवड आणि क्षमता ओळखा त्यानुसार प्रवेश घ्या. मोठे स्वप्न पहा, विचाराने समृद्ध व्हा असे याप्रसंगी सुचवले. प्राचार्य आर.बी.रामावत यांनी शासन राबवत असलेल्या कॉफी मुक्त अभियाना विषयी माहिती दिली व आपल्या शाळेचा एकही विद्यार्थी गैरमार्गाचा अवलंब करणार नाही अशी आशा आपल्या मनोगतातून केली. आपल्या हातून आयुष्यात आपल्या आई-वडिलांना अभिमान वाटेल असे कार्य करावे असे याप्रसंगी सुचवले. स्वतः मधील गुणांना ओळखून त्या क्षेत्रामध्ये प्रवेश घ्यावा असे सांगत परीक्षेसाठी घ्यावयाच्या काळजी विषयी माहिती दिली. याप्रसंगी आर्या लाड, भक्ती वैष्णव, आशिष वैष्णव, तन्मय वाघ, सायली लाड, शिवराज भवर, संग्राम लेंडाळ, गौरव शेळके आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नववीची विद्यार्थिनी कु.अदिती चव्हाण, कु. गौरी औतडे यांनी केले. याप्रसंगी पी.बी. पातकळ, बी.आर. पठाण, एस सी औरंगे, डॉ.जालिंदर येवले, राहुल बोरकर अशोक चव्हाण, महेंद्र नरके आदी शिक्षकांची उपस्थिती होती.

0 टिप्पण्या