पैठण प्रतिनिधी
पैठण हे संत व महतांची पावन भुमी ओळखले जाणारे शहर असुन संत एकनाथांच्या भुमीत नाथांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची नेहमी गर्दी असते. अशा ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय बघता शहराचे जगप्रसिद्ध असलेले चांगले नाव खराब होऊ नये म्हणून त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पैठण तालुक्याचे आमदार विलास बापू भुमरे यांनी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही.एवढेच नव्हे तर आमदार भुमरे यांनी आपल्या पैठण आगारास अशोक लेलँन्ड कंपनीच्या BS6 प्रकारातील नविन दहा बसेस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. म्हणून या नवीन दहा बसेसचा भव्य लोकार्पण सोहळा शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी पैठण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विलासबाप्पू पा. भुमरे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सचिन क्षिरसागर विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ, छत्रपती संभाजीनगर, सुरेंद्र तांदळे यंत्र अभियंता रा.प.म.मं. छत्रपती संभाजीनगर, संतोष घाणे विभागीय वाहतुक अधिकारी रा.प.म.मं. छत्रपती संभाजीनगर याची राहणार आसल्याची माहिती गजानन मडके (आगार व्यवस्थापक, पैठण) यांनी दिली आहे.

0 टिप्पण्या