अहमदनगर

नारायणगाव येथे माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी


पैठण प्रतिनिधी

पैठण तालुक्यातील नारायण गाव येथील विश्वशांती बौद्ध विहार येथे माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती (ता. 7) शुक्रवारी साजरी करण्यात आली.  याप्रसंगी अध्यक्ष महेंद्र गायकवाड, उपाध्यक्ष शुभम गायकवाड, मुंबई पोलीस अनिकेत बाळासाहेब गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच श्रद्धा योगेश रोडे, ग्रामपंचायत सदस्य, महिला यांसह आदिंची उपस्थिती होती. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ओंकेश बनसोडे यांनी जयंती निमित्त मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या