उन्हाळ्यात सकाळी उठताच चहा पिण्याची सवय अनेक लोकांना असते. मात्र, ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, असा इशारा आयसीएमआर (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) यांनी दिला आहे. त्यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आहार मार्गदर्शक सूचनांमध्ये याबाबत स्पष्ट सांगितले आहे की, जेवणाच्या एक तास आधी किंवा नंतर चहा अथवा कॉफी पिणे टाळा.
सकाळी चहा का टाळावा?
आयर्नच्या शोषणात अडथळा
चहा किंवा कॉफीत टॅनिन्स नावाचे घटक असतात, जे शरीरात लोह (Iron) शोषून घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करतात. त्यामुळे अॅनिमिया होण्याचा धोका वाढतो.
कॅफिनचे दुष्परिणाम
चहा आणि कॉफीमध्ये असणारे कॅफिन मेंदूवर त्वरित परिणाम करतं. सतत कॅफिनचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब, तणाव आणि हृदयविकार होण्याची शक्यता वाढते.
दूधातली चहा आरोग्यासाठी अपायकारक
चहा जर दूध घालून प्यायली तर तिचे आरोग्यदायी फायदे कमी होतात. त्याऐवजी ग्रीन टी किंवा ब्लॅक टी आरोग्यासाठी चांगली ठरते. ती हृदयाच्या आरोग्यास फायदेशीर असते आणि रक्तप्रवाह सुधारते.
काय करावे?
- चहा किंवा कॉफी जेवणाच्या किमान एक तास आधी किंवा नंतर घ्या.
- दररोज कॅफिनचे प्रमाण 300 मिलीग्रामपेक्षा जास्त होऊ देऊ नका.
- शक्य असल्यास दूध न घालता चहा प्या.
- उन्हाळ्यात भरपूर पाणी, लिंबूपाणी किंवा नारळपाणी यांचा वापर करून शरीर हायड्रेट ठेवा.
उन्हाळ्यात आरोग्य टिकवून ठेवायचं असेल, तर सकाळी उठताच चहा घेण्याची सवय बदला. या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार वागल्यास तुम्ही तुमचं आरोग्य अधिक चांगल्या पद्धतीने सांभाळू शकता.
0 टिप्पण्या