अहमदनगर

पुण्यात भोंदूबाबाचा पर्दाफाश; तंत्रज्ञानाचा वापर करून जादूटोण्याचा दावा


 पुणे 

सूस गावातील एका 29 वर्षीय भोंदूबाबाचा भांडाफोड करत बावधन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीचे नाव प्रसाद दादा भीमराव तामदार असून तो आपल्या घरातच एक मंदिर चालवत होता. येथे तो भक्त महिलांना देवी-देवतांच्या दर्शनाच्या नावाखाली बोलवून त्यांचं मानसिक व शारीरिक शोषण करत असे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तामदार भक्तांना सांगायचा की त्यांच्यावर लघुग्रह दोष आहे. मग तो त्यांच्या मोबाईलमध्ये एक खास अ‍ॅप डाऊनलोड करायचा. या अ‍ॅपच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून तो त्यांच्या खाजगी गोष्टी जाणून घ्यायचा. त्यानंतर हेच ज्ञान जादूटोना करून मिळवलं असल्याचा दावा करून त्यांना थक्क करायचा.

हे ऐकून महिलांना वाटायचं की बाबा खरंच काहीतरी शक्तीशाली आहे आणि तो काळी विद्या वापरून काहीही करू शकतो. या भीतीमुळे अनेक महिला गप्प राहिल्या. मात्र, एका महिलेने अखेर धीर करून पोलिसांत तक्रार दिली.

त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी तामदार याला अटक केली. तपासादरम्यान त्याच्याकडून लैंगिक शोषण, अ‍ॅपच्या माध्यमातून माहिती गोळा करणे, भक्तांच्या भावना भडकवणे आणि जादूटोना प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी आवाहन केलं आहे की, जर कोणतीही महिला तामदारच्या अशा प्रकारांच्या शिकार झाली असेल, तर ती पुढे येऊन आपली तक्रार नोंदवावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या