अहमदनगर

शेवगावात अवैध मावा कारखान्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई; ३.९८ लाखांचा मुद्देमाल जप्त


शेवगाव प्रतिनिधी 

शेवगाव शहरात अवैध सुगंधीत तंबाखू व मावा तयार करणाऱ्या इसमांविरुद्ध अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने जोरदार कारवाई करत ३ लाख ९८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही धाडसत्राची कारवाई दिनांक १७ जून रोजी रात्री उशिरा पार पडली.

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने ही कारवाई केली असून शेवगाव पोलीस ठाण्यात खलील शहा, अल्ताफ पठाण (दोघे रा. नाईकवाडी मोहल्ला), कुणाल संजय पिसाळ (रा. भगतसिंग चौक), शहाबाज ताहेर खान पठाण व आफताब ताहेर खान पठाण (दोघे रा. बंधन लॉन्स) यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १२३, २२४, २७४, २७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक खाडे व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काही इसम घरात गिरणीच्या सहाय्याने सुगंधीत तंबाखू व कच्ची-पक्की सुपारी मिसळून मावा तयार करून विक्री करत असल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने पंचासमक्ष कारवाई करत विविध ठिकाणी छापे टाकले. छाप्यावेळी तंबाखूजन्य पदार्थ, मावा तयार करण्याचे यंत्र व इतर साहित्य असा एकूण ३,९८,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या धाडसत्रामुळे इतर मावा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून काहींनी गुपचूप पोबारा केल्याचे निदर्शनास आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत संतोष खाडे यांच्यासह पोहेका प्रशांत आंधळे, भिगारदिवे, दिनेश मोरे, शंकर चौधरी, दिंगबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, उमेश खेडकर, सुनिल पवार, अजय साठे, अमोल कांबळे, अक्षय भोसले, सुनिल दिघे, पोसई खेडकर, आकाश चव्हाण, शिरसाठ, अंगरखे यांनी सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या