अहमदनगर

बिहारमध्ये आता १२५ युनिटपर्यंत वीज मोफत, निवडणुकी अगोदर नितीश सरकारची मोठी घोषणा

 


बिहार

बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जवळ येत असताना, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. १ ऑगस्ट २०२५ पासून राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना दरमहा १२५ युनिटपर्यंत वीज मोफत मिळणार आहे. जुलै २०२५ च्या वीज बिलापासूनच याचा लाभ मिळेल आणि यामुळे सुमारे १.६७ कोटी कुटुंबांना फायदा होईल, अशी माहिती मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, सरकारने सुरुवातीपासूनच सर्वांना परवडणाऱ्या दरात वीज उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. आता १ ऑगस्ट २०२५ पासून, म्हणजेच जुलै महिन्याच्या बिलापासून, राज्यातील सर्व घरगुती ग्राहकांना १२५ युनिटपर्यंत विजेसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत.

या घोषणेमुळे राज्यातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. याशिवाय, पुढील तीन वर्षांत राज्यात १०,००० मेगावॉटपर्यंत सौर ऊर्जा निर्माण करण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी छतावर किंवा निवासी भागाजवळील सार्वजनिक ठिकाणी सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात येणार आहेत. गरीब कुटुंबांना 'कुटीर ज्योती योजने'अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी सरकारकडून पूर्ण खर्च उचलण्यात येईल, तर इतरांनाही योग्य सहकार्य मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या