बालमटाकळीतील भव्यदिव्य शताब्दी सोहळ्याची काल्याच्या किर्तनाने सांगता
बोधेगाव प्रतिनिधी
संत - महंताचे अनमोल विचारच माणुसकीला जिवंत ठेवणारे असून अंधश्रद्धेच्या मार्गाने मार्गक्रम करण्याऐवजी प्रत्येकाने संताचेच विचार आत्मसात करावेत व तीच विचारांची संस्कृती टिकून ठेवण्याचे काम करा कारण ते करत राहिल्यास काहीही कमी पडणार नाही असे विचार भगवान गडाचे न्यायाच्यार्य ह.भ. प.डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांनी व्यक्त केले आहे. शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या शताब्दी सोहळ्याची सांगता नामदेव शास्त्री महाराज यांच्या सुश्राव्य काल्याच्या किर्तनाने झाली असून त्यावेळी ते बोलत होते. १९१८ सालामध्ये जोग महाराजांनी बंकट स्वामीना आळंदी येथे जे शिक्षणाचे व विचारांचे धडे दिले ते सर्व बहुजन समाजाच्या हिताचे ठरले असून त्याच वेळी जोग महाराजाचे अनमोल विचार तळा - गळापर्यंत पोहचले गेलेले आहेत. १०० वर्षापूर्वी १९२५ साली गोकुळाष्टमीनिमित्त श्री संत भगवान बाबांनी सुरू केलेला हा सोहळा त्यांच्यानंतर गुरूवर्य भिमशीह महाराज यांनी या सप्ताहाची परंपरा पुढे चालू ठेवली व त्यांच्याच नेतृत्वाने सन २००० मध्ये सोहळ्याचे अमृत महोत्सव साजरे करण्यात आले असून आज हा सप्ताह शताब्दी पार करत असल्याने या सोहळ्याला अनन्य असे महत्व आहे असे सांगून शास्त्री म्हणाले की, अशा या सप्ताहाचा जो काला होतो तो सर्वसमावेशक स्वरूपाचा व सर्व वर्गसमुहाणा एकजुटीने दर्शन घेऊन बरोबर घेऊन जाणारा ठरत असल्याने मी या सोहळ्याच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो. अखंडितपणे १०० वर्षाची परंपरा कायम टिकवून ठेवणे हे देखील गावकऱ्यांचे भाग्यच असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले आहे. संताच्या विचाराने राज्यात कुठेच नसेल असे भगवान गडावर ज्ञानेश्वर महाराजांचे आगळे - वेगळे मंदिर बनवण्याचा प्रयत्न चालू असून सध्या या ठिकाणाहून १९ एम पी एस सी तर २०० विद्यार्थी कीर्तनकार झालेले आहेत असे सांगून देव साधकांसाठी असून त्यास कुठल्याही प्रकारची जाती - धर्माची झालर नसते कारण दलीत वर्गातील असणाऱ्या संत चोखोबांच्या पत्नीने व मुलाने जे अभंग लिहिले ते सर्व अभंग संत - महंतांनी स्वीकारले असल्याचेही शास्त्री महाराज यांनी म्हटले आहे.
या कार्यक्रमास राज्य विधान परिषदेचे सभापती ना.राम शिंदे ,आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ हर्षदाताई काकडे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे, शताब्दी सोहळ्याचे मार्गदर्शक ह भ प राम महाराज झिंजुर्के यांच्यासह अनेक ह भ प महाराजांची व पंचक्रोशीतील भाविक - भक्तांची तसेच गावातील महिला - पुरुषासह ग्रामस्थांची हजारोंच्या संख्यने उपस्थिती होती.शेवटी महाप्रसादाने शताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमाची सांगता झाली आहे . आठ दिवस नामवंत संत महंतांचे कीर्तन झाली
या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेले राज्याचे विधान परिषदेचे सभापती ना.राम शिंदे ,आ मोनिकाताई राजळे हे न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांचे काल्याचे कीर्तन पूर्ण होईपर्यंत बसून राहिले व संपूर्ण काल्याच्या कीर्तन त्यांनी ऐकले व दोघांनीही या शताब्दी सोहळ्याचा लाभ घेता आला असल्याने आम्हाला एक प्रकारे भाग्यच लाभले असल्याचे त्या दोघांनीही आपले विचार व्यक्त करताना म्हटले आहे .
0 टिप्पण्या