शेवगाव प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव दौऱ्यावर असताना विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे साहेबांनी आवर्जून श्री क्षेत्र भगवानगड येथे भेट देऊन ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गडाचे मठाधिपती, ह.भ.प.श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांची भेट घेऊन त्यांचेही आशीर्वाद घेतले.
यावेळी महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री नामदेव महाराज शास्त्री बाबांच्या समवेत त्यांनी श्री क्षेत्र भगवानगड परिसराची आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रगतीपथावर असलेल्या भव्य मंदिर कामाची देखील त्यांनी पाहणी केली. हे मंदिर वारकरी संप्रदायाच्या अखंड परंपरेचे प्रतीक असून, भक्तांसाठी हे केंद्र भविष्यात आणखी भव्य व प्रेरणादायी ठरणार आहे असे भावोद्गार त्यांनी काढले.
श्री क्षेत्र भगवानगड हे केवळ धार्मिक स्थळ नसून अध्यात्म, संस्कार आणि संत परंपरेच्या जतनाचे एक महत्त्वाचे प्रेरणास्थान आहे. या पवित्र स्थळी आल्यानंतर अध्यात्मिक ऊर्जा, शांतता आणि भक्तिभाव यांचा सुंदर अनुभव मिळाला असेही सभापती प्रा. राम शिंदे साहेबांनी सांगितले. यावेळी श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टच्या वतीने सभापती प्रा. राम शिंदे साहेबांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
0 टिप्पण्या