अहमदनगर

विश्वकल्याण मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लि. द्वारे ठेवीदारांचे थकीत पैसे परत...


छत्रपती संभाजीनगर
 

विश्वकल्याण मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे ठेवीदारांची फसवणूक करून पैसे लुटल्याबाबत असंख्य ठेवीदारांनी शासनाकडे तक्रार केली होती. सदर पतसंस्था छत्रपती संभाजीनगर व आसपासच्या परिसरात कार्यरत होती आणि ठेवीदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून पैसे जमा करून घेत होती. विश्वकल्याण मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लि. ची एक शाखा अंभई, ता. सिल्लोड येथे होती व तेथे मुदत ठेवीवर आकर्षक व्याजदर मिळत असल्याने असंख्य निम्न मध्यमवर्गीय लोकांनी सदर पतसंस्थेमध्ये आपले पैसे गुंतविले. दोन ते तीन वर्षानंतर मुदतपूर्ती तसेच काही निकडीच्या कारणास्तव ठेवीदारांनी स्वतःच्या पैशांची पतसंस्थेकडे मागणी केली असता तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी "आज देतो उद्या देतो" असे करून टाळाटाळ केली. तदनंतर ठेवीदारांनी संचालक मंडळातील काही सदस्य व अध्यक्ष यांना विचारपूस केली असता त्यांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली.  त्रस्त ठेवीदारांद्वारे एकत्रित येऊन अॅड प्रतीक तलवार, उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांच्याद्वारे शासनास विश्वकल्याण मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे ठेवीदारांची फसवणूक करून पैसे लुटले असल्याचा तक्रार अर्ज करण्यात आला व संचालक मंडळ विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली. सदर प्रकरणात ठेवीदारांच्या वतीने अॅड. प्रतीक तलवार यांनी काम पाहिले व गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली. गुन्हा नोंद होत असल्याच्या भीतीने संचालक मंडळांनी तत्काळ ठेवीदारांच्या ठेवींची मुद्दल रक्कम अदा केली. 


निम्नवर्गीय व निम्न‌ मध्यमवर्गीय लोक हे अतिशय कष्टाने एक एक पै जमा करून अडीनडीला उपयोगी पडावे म्हणून पैसे साठवून ठेवतात. काही पतसंस्था सदर लोकांना आकर्षक व्याजदराचे अमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे गोळा करते. सदर पैसे वर्षानुवर्ष पतसंस्थेतील संचालक मंडळाद्वारे वापरले जातात व ठेवीदारांना पैसे परत करण्याऐवजी उडवा उडवी चे उत्तरे देऊन त्रास दिला जातो. "आज देतो उद्या देतो" म्हणत वर्षानुवर्ष पैसे दिले जात नाही. अशा संचालक मंडळाविरुद्ध ठेवीदारांनी एकत्र येऊन गुन्हा नोंदवावा व त्यांच्या आमिषाला बळी पडू नये असे प्रतिपादन अॅड प्रतीक तलवार यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या