अहमदनगर

पंचायत समिती भानगाव गणासाठी अमोल कोहक इच्छुक


विसापूर

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी नुकतेच आरक्षण जाहीर झाले असुन त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे तसेच नेतेमंडळी कडे उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. श्रीगोंदा तालुक्यात भाजप‌  व राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन महायुतीच्या पक्षातच लढत होण्याची शक्यता आहे. भानगाव पंचायत समिती गणात सर्वसाधारण जागा निघाल्याने अनेक कार्यकर्ते निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. भाजप कडुन या गणासाठी तरूण चेहरा देण्यावर भर देण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टी कडुन भाजपचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल कोहक हे इच्छुक असुन, उमेदवारीसाठी त्यांनी भानगाव गणात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्व सामान्य व तरूणांशी त्यांचा मोठ्या प्रमाणावर संपर्क आहे. कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून  मागील अनेक  वर्षांपासून गणातील सर्व गावातील शेतकऱ्यांचा संपर्क आहे. त्यांची पत्नी ढोरजे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच आहे तसेच काशी विश्वनाथ देवस्थान च्या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणात विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून गावचा विकास केला आहे. विकासॉ कामे करताना अनेक नविन संकल्पना राबवुन , सामाजिक सहभाग तसेच तळागळातील सर्वांच्या सहकार्याने अनेक कामे केली आहेत. सर्व सामान्याचा विश्वास, ज्येष्ठाचा आशिर्वाद, तरूणांच्या साथीने भानगाव गणाचा नियोजन बद्ध विकास करण्यासाठी तसेच सर्व सामान्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पंचायत समिती निवडणूक लढवणार आहेत. भारतीय जनता पार्टी कडुन‌ तालुकाध्यक्ष डॉ. विक्रम भोसले, तांदळीचे उपसरपंच राजेंद्र भोस, भानगावचे सरपंच अशोक नवले, सुरेश‌‌ पंढरीनाथ सुडगे, सामाजिक कार्यकर्ते रामदास साबळे यांची उमेदवारीसाठी  नावे चर्चेत आहेत. उमेदवारी बाबत अतिंम निर्णय मात्र आमदार विक्रम पाचपुते कोणाला उमेदवारी देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या