अहमदनगर

भाजपमध्ये नवा उत्साह; गणेश रांधवणे, सतिश लांडे, प्रसाद पवार, यांचा प्रवेश


बोधेगाव प्रतिनिधी
 

शेवगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षात आज नवचैतन्य संचारले. समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले मनसेचे गणेश रांधवणे, शेवगावचे माजी सरपंच सतिश लांडे, प्रसाद पवार यांनी आज औपचारिकरित्या मुंबई येथे भाजपमध्ये नुकताच

प्रवेश  केला आहे.      या प्रवेश सोहळ्यास भाजप प्रदेशाध्यक्ष  रविंद्र चव्हाण, आ. मोनिका राजळे, तालुकाध्यक्ष महेश फलके, तसेच भाजप नेते संजय टाकळकर यांची उपस्थिती लाभली.

भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून या चारही कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केल्याचे सांगण्यात आले. या प्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, “भाजप हा विकास, पारदर्शकता आणि जनतेच्या विश्वासाचा पक्ष आहे. नव्या कार्यकर्त्यांच्या ऊर्जेने पक्ष आणखी मजबूत होईल.”

कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. प्रवेशानंतर तालुक्यात भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून नव्या चेहऱ्यांच्या आगमनाने पक्ष संघटनेला नवी ऊर्जा मिळाली आहे.

भाजप प्रवेश सोहळ्यात सरपंचांचा रहस्यमय ‘गायब’ प्रकार,  बोधेगाव भागात राजकीय खळबळ

पूर्व भागातील एका प्रभावशाली ग्रामपंचायतीचे सरपंच, ज्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा पराभव करून राष्ट्रवादी प्रणित मंडळाकडून सत्ता मिळवली होती, ते भाजप प्रवेशासाठी स्वतः कार्यकर्त्यांसह प्रदेश कार्यालयात गेले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मंगळवारी त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम ठरलेला होता. यादीत नावाचाही समावेश झाला, समर्थक मंडळी मुंबई गाठून उत्साही वातावरण तयार झाले... पण प्रवेशाचा क्षण जवळ आला आणि सरपंच अचानक ‘गायब’!
या नाट्यमय वळणाने भाजप प्रदेश कार्यालयात संभ्रम पसरला, तर शेवगाव-बोधेगाव परिसरात चर्चेचा भडका उडाला आहे. प्रवेश स्थगित झाल्याने “नेमके घडले तरी काय?” असा प्रश्न सगळ्यांच्याच तोंडी आहे. काही सूत्रांचे म्हणणे आहे की, स्थानिक पातळीवरील अंतर्गत राजकारण आणि गटबाजीमुळे शेवटच्या क्षणी ‘ब्रेक’ मारला गेला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या