अहमदनगर

दिवटे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सोनल कणसे बिनविरोध


बोधेगाव  प्रतिनिधी

दिवटे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. सोनल प्रकाश कणसे यांची आज बिनविरोध निवड झाली. विद्यमान उपसरपंच सौ. सुनीता सांगळे यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर ही निवड प्रक्रिया पार पडली.

उपसरपंचपदासाठी सोनल कणसे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यांना नंदा वंजारी यांनी सूचक तर सुनीता सांगळे यांनी अनुमोदक म्हणून पाठिंबा दिला. एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध घोषित करण्यात आली.

या निवडणुकीचे निर्णय अधिकारी ग्रामसेवक गोकुळ बळीद होते.

यावेळी सरपंच सौ. मनिषा माळी, माजी उपसरपंच सौ. सुनीता सांगळे, जेष्ठ मार्गदर्शक भागवत कणसे पाटील, तसेच भाऊराव जावळे, नानासाहेब कणसे, काकासाहेब जावळे, श्रीमंत जावळे, सोपानराव कणसे, बाबुराव माळी, लक्ष्मण कव्हाळे पाटील, नामदेव कणसे, नामदेव जावळे, भैसाहेब कणसे, आबासाहेब वंजारी, किशोर कणसे, कृष्णा कणसे, संतोष सांगळे, सुरेश सांगळे, सुभाष चव्हाण, अनिल पवार, सुनील सांगळे, महेश जावळे, सुधीर जावळे, राजू जावळे, विजय वंजारी, अजिनाथ माळी, बापूराव भराट, गोकुळ भराट,दिलीप जावळे, शहादेव जावळे  आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

निवड जाहीर होताच गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून ग्रामस्थांनी जल्लोष केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या