अहमदनगर

राजस्थानमध्ये बनावट कागदपत्रांवर ५० हजार सिम कार्ड जारी; १० आरोपींना अटक


 जयपूर

राजस्थानच्या बालोतरा जिल्हा पोलिसांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड ॲक्टिव्हेट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दहा आरोपींना अटक केली आहे.

आरोपींनी गेल्या आठ महिन्यांत देशभरात बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन ५० हजार मोबाईल सिम कार्ड जारी केले होते. यापैकी १५ हजार सिम कार्ड फक्त बालोतरा जिल्ह्यातून जारी करण्यात आले होते. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून १९ मोबाईल फोन, तीन लॅपटॉप आणि बँकांमधील आर्थिक व्यवहाराचे कागदपत्रे जप्त केले आहेत.

बालोतराचे पोलीस अधीक्षक रमेश कुमार यांनी सांगितले की, अटक केलेले दहा आरोपी राजस्थानच्या विविध जिल्ह्यांचे रहिवासी आहेत. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून पाळत ठेवण्यात आली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीत बहुतेक मोबाईल फोन आणि सिम कार्ड विकणारे दुकानदार सामील आहेत. बनावट कागदपत्रांवर जारी करण्यात आलेल्या या सिम कार्डचा उपयोग दारूची तस्करी आणि फसवणूक (ठगी) करण्यासाठी केला जात होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या