अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्याचे राजकारण आणि सहकार क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि नगर-राहुरी विधानसभा मतदारसंघाचे पाच वेळा प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आज पहाटे उपचारादरम्यान निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. जनसंपर्क आणि प्रभावी नेतृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या कर्डिले यांनी शेतकरी हित, ग्रामीण विकास आणि जलसंधारण यांसारख्या क्षेत्रांत अनेक उल्लेखनीय कामे केली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या