जयपूर
ओडिशामधील जयपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जयपूर शहरात बुधवारी एका मंदिराशेजारी एका तृतीयपंथी पुजारी आणि एका गवंड्याचा मृतदेह आढळून आला आहे. दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा ही घटना जयपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील गोपबंधु नगरमधील कनक दुर्गा मंदिराजवळची आहे. ज्या दोघांचे मृतदेह सापडले आहेत, त्यांच्यात प्रेमसंबंध असावेत, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृतांची ओळखही पटली आहे. तृतीयपंथी पुजारी म्हणून मंदिरात काम करत होते, त्यांची ओळख राजू मच्छ अशी झाली आहे. तर गवंड्याची ओळख समारा अशी झाली आहे.
पोलीस सांगतात की, राजू आणि समारा यांचे गेल्या काही महिन्यांपासून कथितरित्या संबंध होते. दोघांनाही मंगळवारी संध्याकाळी मंदिराशेजारी एकत्र पाहिले गेले होते. त्यानंतर त्यांचे मृतदेह सापडले.
पोलीस अधिकाऱ्यांचे आले निवेदन जयपूर उप-विभागीय पोलीस अधिकारी (SDPO) पार्थ कश्यप यांनी सांगितले, "अनैसर्गिक मृत्यूचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, सखोल तपास सुरू आहे. एका टीमने घटनास्थळाची तपासणी केली आणि प्रथमदर्शनी पुराव्यांवरून हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसून येते. तथापि, नेमके कारण शोधण्यासाठी सर्व संभाव्य पैलू तपासले जात आहेत."
0 टिप्पण्या