अहमदनगर

अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचीन गुजर यांना अपहरण करून मारहाण; श्रीरामपुरात संतप्त कार्यकर्त्यांचा तीव्र निषेध


श्रीरामपूर

अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्ह्यातून एक धक्कादायक राजकीय बातमी समोर आली आहे. मॉर्निंग वॉकला गेलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे कारमधून अपहरण करून त्यांना काही युवकांनी बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे श्रीरामपूर येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी या हल्ल्याविरोधात तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलन केले.   

नेमकं काय घडलं?

नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू असतानाच, सोमवारी सकाळी श्रीरामपूर येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांना काही लोकांनी कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना अज्ञातस्थळी नेऊन त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि बेदम मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांनी मारहाण करून सचिन गुजर यांना गंभीर जखमी केले.

राजकीय वातावरण तापले

सचिन गुजर यांच्यावर झालेल्या या हल्ल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमले. राजकीय दबावातून किंवा निवडणुकीच्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्रीरामपूर शहरात आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांकडून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या सचिन गुजर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या