अहमदनगर

विजय निश्चित! राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार सुनील काकडे आणि हिराबाई वीर यांचा दावा


बोधेगाव प्रतिनिधी 

शेवगाव नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ११ मधील रखडलेले वीज, पाणी, रस्ते, गटार यांसारखे मूलभूत प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी मतदारांनी स्वतःच निवडणुकीची धुरा हाती घेतल्याने विजय निश्चित असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे उमेदवार सुनिल काकडे आणि हिराबाई वीर यांनी सांगितले.

प्रभागामध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून “विकासासाठी मतदार आता स्वतःच पुढे सरसावले आहेत” असे उमेदवारांनी नमूद केले.

मागील निवडणुकीत केवळ दोन मतांनी विजय हुकल्याची सल मतदारांच्या मनात असल्याने यावेळी कार्यकर्ते आणि मतदार अधिक जागरूकतेने प्रचारात सहभागी झाले आहेत.

प्रभागातील विविध मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देऊन विकासकामे पुढे न्यायची संधी मिळावी, ही सर्वसामान्य जनतेची भावना असून सर्व स्तरातून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे ही निवडणूक मतदारांनीच हाती घेतल्याने विजय निश्चित असल्याचा विश्वास सौ काकडे आणि सौ वीर यांनी व्यक्त केला.

यावेळी सुनिल काकडे यांनी “संधी मिळाल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास करून दाखवू” असे आश्वासनही दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या