अहमदनगर

विरारमध्ये सापासोबत स्टंटबाजी बेतली जीवावर; सापाला गळ्यात घालणाऱ्या तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू


मुंबई

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी जीवघेणे स्टंट करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. विरारच्या नवापूर परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय राजू चंदू बरड या तरुणाने मद्याच्या नशेत एका विषारी सापाला पकडले. केवळ साप पकडून न थांबता तो सापाशी खेळू लागला आणि त्याने तो साप आपल्या गळ्यातही घातला. ही 'हिरोगिरी' सुरू असतानाच संतापलेल्या सापाने राजूच्या हाताला जोरदार दंश केला. सापाने चावा घेताच राजूची प्रकृती वेगाने खालावली. उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या