अहमदनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार; वाहन थांबवल्याच्या वादातून चालकाचे गुप्तांग कापले


छत्रपती संभाजीनगर 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर-लासुर रोडवर एका ३२ वर्षीय मिनी पिकअप चालकासोबत अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना घडली आहे. रस्त्यावर वाहन थांबवल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान एका भीषण हल्ल्यात झाले, ज्यामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी चालकाचे गुप्तांग कापून त्याला सोडून दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री शिंदेवाडी गावाजवळ घडली. पीडित चालक आपल्या मित्रासोबत पिकअप व्हॅनमधून माल पोहोचवून परतत असताना अचानक गाडीत तांत्रिक बिघाड झाला. यामुळे गाडी रस्त्याच्या मध्यभागी उभी करावी लागली. त्याच वेळी तिथून जाणाऱ्या एका व्हॅनची या पिकअपला धडक बसता बसता राहिली. यावरून दोन्ही गटात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि व्हॅनमधील ६ ते ७ जणांनी चालकावर हल्ला चढवला. जीव वाचवण्यासाठी चालक जवळच्या शेतात पळाला असता, हल्लेखोरांनी त्याला गाठून बेदम मारहाण केली आणि धारदार शस्त्राने त्याचे गुप्तांग कापले. या गंभीर घटनेनंतर आरोपींनी रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या चालकाला रस्त्यावर सोडून पळ काढला. जखमी चालकावर सध्या गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या