अहमदनगर

भोंदू बाबा अशोक खरातच्या मुलाला एसआयटीकडून फिल्मी स्टाईलने अटक


नाशिक

नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्यावरील तपासाचा विळखा आता त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचला आहे. बुधवारी संध्याकाळी विशेष तपास पथकाने (SIT) खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला ताब्यात घेतले आहे. नाशिकच्या कर्मयोगी नगर भागातील 'तृप्तबाला' बंगल्यावर ही कारवाई करण्यात आली. सुरुवातीला एसआयटी अधिकाऱ्यांना बंगल्यात प्रवेश नाकारण्यात आला होता, त्यानंतर पोलिसांनी शेजारच्या घराची भिंत ओलांडून फिल्मी स्टाईलने आत प्रवेश केला आणि हर्षवर्धनला पकडले. ताब्यात घेतल्यानंतर त्याला तात्काळ त्र्यंबकेश्वर रोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमी कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले आहे. या चौकशीतून अशोक खरातची मालमत्ता आणि इतर गुन्ह्यांबाबत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. खरातवर आतापर्यंत १० गुन्हे दाखल असून त्यापैकी ८ गुन्हे लैंगिक शोषणाचे आहेत. दरम्यान, पोलीस आता खरातच्या फरार पत्नीचाही शोध घेत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या